एनसीआय भारतातील सर्वोत्तम कर्करोग रुग्णालय

08 Mar 2026 11:46:41
नागपूर,
National Cancer Institute Nagpur, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व टाटा ट्रस्ट््सचे अध्यक्ष नोेएल टाटा यांनी शनिवारी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या या कॅन्सर उपचार सुविधेचे नोएल टाटा यांनी मनापासून कौतुक केले. फडणवीस हे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य संरक्षक तसेच माजी अध्यक्ष आहेत.
 

National Cancer Institute Nagpur 
या भेटीदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, टाटा ट्रस्ट््सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा, टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी डॉ. शैलेश व्ही. श्रीखंडे उपस्थित होते. या भेटीमुळे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि टाटा ट्रस्ट्स यांची मध्य भारतातील कॅन्सर उपचार व्यवस्था अधिक मजबूत करण्याची सामायिक बांधिलकी अधोरेखित झाली.
मुख्यमंत्री व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या नेतृत्वाशी संवाद साधताना नोएल टाटा म्हणाले, ही अतिशय उत्कृष्ट उभारणी आहे. कदाचित भारतातील आपल्या प्रकारातील हे सर्वोत्तम रुग्णालय असावे. मनःपूर्वक अभिनंदन.संस्थेचे वर्णन जागतिक दर्जाच्या सुविधेप्रमाणे करताना नोएल टाटा यांनी तंबाखूच्या वाढत्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. या प्रदेशात कॅन्सर होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणून तंबाखूचा वाढता वापर समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले.टाटा ट्रस्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा यांनी कॅन्सर संशोधन अभ्यास आणि क्लिनिकल ट्रायल्ससाठी टाटा ट्रस्ट्स आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तपणे सहकार्य करण्याची ही योग्य वेळ असल्याचे सुचविले.
या भेटीदरम्यान नॅशनल National Cancer Institute Nagpur, कॅन्सर इन्स्टिट्यूटचे महासचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना आणि देशातील अग्रगण्य कॅन्सर उपचार केंद्र म्हणून झालेली त्याची प्रगती याबाबत सविस्तर सादरीकरण केले. टाटा ट्रस्ट्सच्या प्रतिनिधी मंडळाला आरोग्य सेवा आणि कॅन्सर संशोधन क्षेत्रातील आगामी उपक्रमांची माहिती देण्यात आली.यापूर्वी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील मनोहर, शैलेश जोगळेकर आणि डॉ. आनंद पाठक यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच संस्थेची पाहणी करून दिली. या प्रसंगी ग्लोबल ऑपरेशन्स अँड स्ट्रॅटेजीचे संचालक शशी मंदापती आणि खजिनदार आनंद औरंगाबादकर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0