३ लाख थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडित

08 Mar 2026 20:16:13
मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल
 
 
यवतमाळ, 
Power outage आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे २४ दिवस शिल्लक असताना अमरावती परिमंडळात वीज बिलांची थकबाकी पातळीवर पोहोचली आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यवसायी, औद्योगिक व इतर ग्राहकांकडून तब्बल ७०७ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. महावितरणने वीज बिल वसुलीसाठी रोहित्रनिहाय नियोजन केले असून ही थकबाकी परिमंडळातील १६ हजार ६६९ रोहित्रांवर असल्याने, महावितरणतर्फे वसुलीसाठी कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मु‘य अभियंता अशोक साळुंके यांनी दिला आहे. दोन जिल्ह्यांमध्ये थकबाकीचा आकडा मोठा आहे. अमरावती जिल्ह्यातील ८०५३ रोहित्रांवर १ लाख ४६ हजार ७६७ ग्राहकांकडे २५८ कोटी ४४ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील ८६१७ रोहित्रांवर १ लाख ७२ हजार ग्राहकांकडे ४४९ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे.
 
 
power
 
त्यामुळे रोहित्रनिहाय वसूलीचे सुक्ष्म नियोजन केले असून प्रत्येक थकबाकी शून्यावर आणण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे परिमंडळातील ३ लाख थकबाकीदार वीज ग्राहक महावितरणच्या रडारवर असून Power outage  वीजबिल वसुलीसाठी शाखा कार्यालयनिहाय मोहिमा काढण्यात आल्या आहेत. यात सुमारे १ लाख ग्राहकांकडे १ हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून त्यांच्याकडे ४७ कोटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. वसुली मोहिमेत कारवाई करताना थेट काढून आणण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे वसुली मोहिमेदरम्यान अडथळा आणणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल, तसेच आवश्यक असल्यास पोलिस मदतही घेण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.
 
 
तसेच Power outage  परिमंडळ कार्यालयाकडून वसुली मोहिमेचा दररोज आढावा घेतला जात आहे. थकबाकीदार ग्राहकांना बिल भरण्यासाठी महावितरणकडून थेट कॉल करून सूचना दिल्या जात याशिवाय यंदा प्रथमच यंत्रचालक, सुरक्षा रक्षक आणि कार्यालयीन बाह्यस्रोत कर्मचार्‍यांनाही वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसह कार्यालयीन कर्मचार्‍यांनाही वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0