PMPML कडून पुण्यात महिलांसाठी मोफत बस सेवा

08 Mar 2026 16:41:52
पुणे
PMPML जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) कडून शहरातील महिला प्रवाशांसाठी एक खास उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. आज, ८ मार्च २०२६ रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात धावणाऱ्या निवडक बसमार्गांवर महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील हजारो महिला प्रवाशांना दिलासा मिळणार असून, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 

Pune women free bus service, PMPML women day initiative 
महिला दिनानिमित्त PMPML ने पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PMRDA) हद्दीतील महिलांसाठी ३१ निवडक बसमार्गांवर मोफत सेवा सुरू केली आहे. यामुळे महिला प्रवाशांना विविध भागांमध्ये सहजपणे आणि तिकिटाशिवाय प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे.
या उपक्रमाचा लाभ PMPML  पुण्यातील महत्त्वाच्या मार्गांवर होणार असून, त्यात स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर, मनपा भवन ते वडगाव शेरी, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, एनडीए गेट क्रमांक १० ते मनपा भवन आणि कात्रज ते शिवाजीनगर यांसारख्या मार्गांचा समावेश आहे.तसेच, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, धनकवडी ते न.ता. वाडी, हडपसर गाडीतळ ते वारजे माळवाडी, भेकराईनगर ते मनपा भवन यांसारख्या विविध मार्गांवरही महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.महिला दिनाच्या निमित्ताने PMPML ने लांब पल्ल्याच्या मार्गांवरही मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. हडपसर ते निगडी भक्ती-शक्ती, हडपसर ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर गाडीतळ, हडपसर ते मांजरी बु. आणि मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव या मार्गांवर महिलांना तिकिटाशिवाय प्रवास करता येणार आहे.
 
 
तसेच लोकशाहीर PMPML  अण्णा भाऊ साठे स्थानक ते शिवाजीनगर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्थानक ते पुणे स्टेशन या मार्गांवर देखील मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द, मनपा भवन ते मुकाई चौक किवळे, निगडी ते मेगापॉलिस हिंजवडी आणि भोसरी ते हिंजवडी माण फेज ३ अशा मार्गांवरही महिलांना मोफत प्रवास करायला मिळणार आहे.महिला प्रवाशांसाठी पुणे मेट्रोकडून देखील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोच्या प्रत्येक डब्यात महिलांसाठी स्वतंत्र राखीव जागा ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील काही जागा आरक्षित करण्यात येणार आहेत.या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीमधील महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.महिला दिनानिमित्त दिलेली मोफत सेवा शहरातील महिला प्रवाशांसाठी एक मोठी भेट ठरली आहे. महिलांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून, हा उपक्रम त्यांच्या प्रवासाला अधिक आरामदायक आणि सोयीस्कर बनविणारा ठरला आहे.या उपक्रमामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिलांसाठी विशेषत: शहरातच्या गजबजलेल्या मार्गांवर मोफत प्रवासाची सुविधा देऊन PMPML ने एक महत्त्वाची सामाजिक जबाबदारी पार केली आहे महिला दिनानिमित्त असलेल्या या उपक्रमामुळे पुण्यातील महिला प्रवाशांना एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचे दिसत आहे, आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या या निर्णयाचे महिलांकडून स्वागत करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0