देवळीत रस्ते व पुलांसाठी ३६ कोटी

08 Mar 2026 22:11:58
 आ. बकाने यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार
 
देवळी, 
देवळी—पुलगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या विकासासाठी राज्याच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल ३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर होणार आहे. या निधीमध्ये रस्ते सुधारणा व मजबुतीकरणासाठी ३० कोटी रुपये तर तीन पुलांच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या संदर्भात Rajesh Bakane आ. राजेश बकाने म्हणाले की, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला यश मिळत राज्याच्या अर्थसंकल्पात विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत शिरपूर—विजयगोपाल—पुलगाव रस्त्याकरिता ४.५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हिंगणघाट,—वणी,—शिरुड,— अल्लीपूर, टाकळी (दरणे),—गिरोली या महत्त्वाच्या मार्गाकरिता ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय सालोड,—पडेगाव,—चिकणी रस्ता सुधारणा कामासाठी ४.५ कोटी रुपये तर देवळी,—दिघी, बोपापूर,—सरूर या भागासाठी ५.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
 
bakane
 
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी धामणगाव—वाठोडा—दहेगाव गावंडे रस्ता जमबुतीकरण व डांबरीकरणासाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच तरोडा,—सावली,—सास्ताबाद रस्ता कामासाठी ५ कोटी रुपये, वर्धा,—वायफड,—रसुलाबाद रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या सर्व कामांमुळे मतदार संघातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीमाल वाहतूक, शिक्षण, आरोग्य सेवा तसेच बाजारपेठांशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
 
 
Rajesh Bakane  या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. या कामांची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करून गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यत केली. मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून आगामी काळात आणखी विकासकामे मंजूर करून आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरूच राहील, असेही आ. बकाने यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0