शिवरायांची मूर्ती देऊन व्यक्त केले शिक्षकांचे ऋण

08 Mar 2026 20:49:16
विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान

नेर,
Respect for teachers गुरू-शिष्य या अतूट नात्याची परंपरा महाराष्ट्राने पूर्वापार जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नेर येथील पांगारकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.
 
 
samman
 
Respect for teachers  निमित्त होते तिथीनुसार छत्रपतींच्या जयंतीचे. वर्ग दहावीतील विद्यार्थी खुशी राऊत, भाविका खंडरे, श्रुती खंडरे, अंशुका रंगारी, जान्हवी विनीत पवार, सोहम भोकरे, सिद्धेश चिंचोळे यांनी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक मनीष नागलवाडे व मनीष पांगारकर यांना गणित व इंग‘जी विषयाच्या उत्तम अध्यापनासाठी धन्यवाद दिले. यावेळी शिक्षक पांगारकर व नागलवाडे यांनी, भविष्यात विद्यार्थी हितासाठी काम करत राहण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. यावेळी संस्कृती झाडे, गायत्री राठोड, धनश्री राठोड, दिव्या गायकवाड, वैष्णवी दिव्यानी आडे, समृद्धी खडसे या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0