एसडीपीओंचा दणका : रोहिणी घाटावर कारवाई

08 Mar 2026 21:43:00
२० अटकेत : १.४२ कोटींचा मुद्देमाल जप्त

अमोल सांगानी
राळेगाव, 
Rohini Ghat यंत्रणेच्या नाकावर टिच्चून राळेगाव तालुक्यातील रोहिणी घाटावर राजरोस अवैध वाळू उपसा करणार्‍यांना पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या दणका दिला. या धाडीत शनिवार, ७ मार्चच्या मध्यरात्रीनंतर १.३० वाजता छापा टाकून २० जणांना अटक करण्यात आली. यावेळी ११ टिप्परसह २ बोटी, २ पोकलँड मशीन असा एकूण १ कोटी ४२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
 
 
rohandi
 
Rohini Ghat  राळेगाव तालुक्यातील येथील वर्धा नदीच्या पात्रातून विनापरवाना वाळूचे उत्खनन करून गौणखनिजाची चोरी करीत असल्याची गोपनीय माहिती पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल व त्यांच्या पथकाने रोहिणी घाटावर छापा टाकला. या कारवाईत ११ टिप्परसह २ बोटी, २ पोकलँड मशीन असा एकूण १ कोटी ४२ ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा अवैध वाळूसाठा आणि उत्खनन व वाळू वाहतुकीकरिता वापरलेली वाहने जप्त करून वडकी पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाने यशस्वी केली
Powered By Sangraha 9.0