छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांना प्रारंभ

08 Mar 2026 19:20:50
अर्जुना येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
२,०८६ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ
निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या हस्ते उद्घाटन

यवतमाळ, 
महसूल विभागाच्या वतीने तालुक्यातील अर्जुना येथील जि. प. आयोजित Samadhan Camp Campaign छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला अर्जुना मंडळातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुविधांचा लाभ घेतला. शिबिरात २,०८६ लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला. नागरिकांकडून अर्ज स्वीकारून त्यांच्या तक‘ारींचेही निराकरण करण्यात आले. सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अभियानाच्या जनजागृतीपर प्रभात फेरीने कार्यक‘मास प्रारंभ झाला. त्यानंतर शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
 
 

arjuna
 
यावेळी अर्जुना ग‘ामपंचायतीच्या सरपंच, यवतमाळचे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, विधी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार आणि तालुका कृषी अधिकारी पूजा गवई उपस्थित होत्या. या प्रसंगी डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी शेतकर्‍यांना हंगामपूर्व शेती मशागतीबाबत आवश्यक आधुनिक शेती पद्धती तसेच चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी महिलांशी संवाद साधत महिला सशक्तीकरण, महिलाविषयक विविध कायदे तसेच महिलांनी आर्थिक सक्षम होण्याच्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.
 
 
Samadhan Camp Campaign यानंतर कृषी विभागामार्फत महाविस्तार अ‍ॅपबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. महसूल विभागाच्या विविध नवीन शासन निर्णय व माहिती तहसीलदारांनी उपस्थितांना दिली. तसेच विविध विभागांच्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात दाखल्यांचे वितरण करण्यात आले. डाक विभागाच्या वतीने त्यांच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक‘माच्या उत्तरार्धात नागपूर येथून आलेले डॉ. ओंकार होलमोरे यांनी नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या शिबिरात नायब तहसीलदार रुपाली बेहरे यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाची हा उपक‘म राबवून प्रशासनाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी शिबिराला भेट देऊन उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविले व अभियानाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक‘माच्या आयोजनासाठी अर्जुना मंडळ अधिकारी नितीन खरोडे, अर्जुना मंडळातील ग‘ाममहसूल अधिकारी व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0