मनसेतर्फे शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा साजरा

08 Mar 2026 21:15:01
वणी, 
Shiv Jayanti हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीदिनी वणी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आणि नेत्रदीपक शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनसे नेते, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून मागील काही वर्षांपासून वणी शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत असून यंदाही त्याच परंपरेला साजेसा दिमाखदार सोहळा पार यावर्षीच्या सोहळ्याचे मु‘य आकर्षण म्हणजे महाराजांच्या पुतळ्यामागे उभारण्यात आलेली १०० फूटांहून अधिक उंचीची भव्य किल्ल्याची प्रतिकृती होते. या देखाव्यामुळे आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण दणाणून गेले होते.
 
 
mns
 
Shiv Jayanti कार्यक‘मासाठी मोठ्या सं‘येने नागरिकांनी गर्दी केली होती. विशेषतः महिला आणि तरुणांची उपस्थिती होती. यावेळी राजू उंबरकर म्हणाले, हा सोहळा केवळ एक उत्सव नसून रयतेच्या अस्मितेचे प्रतीक आहे. पुढील काळात हा शिवजयंती उत्सव यापेक्षाही अधिक भव्य स्वरूपात साजरा केला जाईल. आपल्या भाषणात त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भविष्यात अधिक भव्य आणि अश्वारूढ स्वरूपात उभारण्याची भावना व्यक्त केली. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्नशील अश्वारूढ पुतळ्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही दिली. या शिवजयंती सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या सं‘येने उपस्थित होते. तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक‘माला मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकही मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0