बदलत्या हवामानामुळे उन्हाळा विक्रमी उष्णतेचा
नागपूर,
होळी झाल्यानंतर आता आकाशातून सूर्य आग ओकायला लागल्याचे दिसून येते. Temperature तापमान वाढत असताना रविवारी नागपूरचे तापमान ३७ अंशावर पोहोचले आहे. तापमानाने उसळी सुरुवात केली असून अकोला ४०.९ अंश तर अमरावती ३९.२ अंशावर पोहोचले आहे. सर्वच जिल्ह्यांत पारा सरासरीपेक्षा १ ते २ अंशांने अधिक आहे. उन्हाचे चटके सकाळपासूनच जाणवत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यांमधील तापमान सर्वाधिक ४८ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर येत्या आठवड्याभरात तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता.
उन्हाचे आजार वाढण्याचा धोका
मुख्यत: फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यापासूनच उन्हाचा प्रभाव दिसून येत आहे. शेवटच्या आठवड्यात पारा चढायला लागला असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. आगामी दिवसात नागपूरसह विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. Temperature तापमान वाढल्याने पाण्याची व विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे जिल्हा व शहर प्रशासनाने आतापासून काळजी गरज आहे. उन्हाचे आजार वाढण्याचा धोका लक्षात घेता विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व बाहेर काम करणार्यांनी उन्हापासून बचाव करावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. हवामान बदलाचा परिणाम उन्हाळ्यावरच नाही, तर हिवाळा आणि पावसाळ्यावरही झाला आहे.