तेहरान,
us-israeli-attacks-on-oil-reserves-iran मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाने आता अत्यंत धोकादायक वळण घेतले असून शनिवारी उशिरा रात्री अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याने इराणची राजधानी तेहरानवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या कारवाईत इराणच्या तेल साठवण केंद्रे आणि ऊर्जा व्यवस्थेला मुख्य लक्ष्य करण्यात आले.
हल्ल्यानंतर संपूर्ण तेहरानमध्ये स्फोटांचे प्रचंड आवाज घुमले. शहराच्या विविध भागांत आगीच्या ज्वाला आणि दाट धुराचे लोट दूरवरून दिसत होते. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार दक्षिण तेहरान तसेच वायव्य भागातील शहरान येथील तेल साठवण केंद्रावर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. us-israeli-attacks-on-oil-reserves-iran या स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचे आवाज शेजारील कारज शहरापर्यंत ऐकू आले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे चित्र समोर आले असून आकाशात काळ्या धुराचे ढग पसरलेले दिसत होते. तज्ज्ञांच्या मते ऊर्जा क्षेत्रावर थेट हल्ला करून इराणची अर्थव्यवस्था आणि लष्करी पुरवठा व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले आहे.
सौजन्य : सोशल मीडिया
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इराणला कठोर इशारा दिला होता. इराणी नेतृत्वावर कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतरच या हल्ल्यांची मालिका घडल्याचे सांगितले जात आहे. वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या संघर्षात इराणमध्ये किमान १,२३० लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये २९० पेक्षा अधिक आणि इस्रायलमध्येही काही जणांचा जीव गेला आहे. इस्रायली सैन्याने या कारवाईची जबाबदारी स्वीकारली असून इराणी सैन्य वापरत असलेल्या इंधन साठवण केंद्रांवर लक्ष्य साधल्याचा दावा केला आहे. us-israeli-attacks-on-oil-reserves-iran तेहरानजवळील शहर-ए-रे परिसरातील मुख्य तेल शुद्धीकरण केंद्र तसेच अल्बोर्झ प्रांतातील अनेक तेल साठवण केंद्रांनाही या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.हल्ल्यानंतर तेहरानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक भागांत आग आणि धुराचे मोठे लोट दिसत आहेत. या घटनांमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.