जात, पंथ, उपासना भेद बाजूला सारून समरस

08 Mar 2026 21:34:12
हिंदुत्व अंगिकारावे व्यंकटस्वामी महाराज

उमरखेड, 
Venkataswami Maharaj हिंदू धर्माचे आचरण सर्वांनी करून आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत. त्याचबरोबर जात, पंथ हा भेद बाजूला सारून सर्वांनी हिंदुत्वासाठी एकत्र यावे, असे प्रतिपादन तालुक्यातील मार्लेगाव येथे मंडळ हिंदू संमेलनानिमित्त आयोजित कार्यक‘मात महाराज यांनी केले. यावेळी महानुभाव संप्रदाय महंत महिपाळ बाबा, पुरुषोत्तम महाराज इंगोले, नारायण महाराज, दत्तराव कदम महाराज, भगवान कदम पुजारी आणि प्रमुख वक्ते अनिल गावंडे उपस्थित होते. कार्यक‘माची सुरवात मार्लेगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक‘माने झाली.
 
 
vand
 
यावेळी गुणवंत विद्यार्थी अक्षरा जयवंत कदम, प्राची प्रवीण कदम, प्रज्ञा दीपक काळे, गजानन कदम, तसेच महादीप विमानवारी पात्र तृप्ती मारुती चंद्रवंशी, जिल्हा फेरी पात्र प्राची गजानन शिंदे, अदिती रामेश्वर कदम यांचे भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. कार्यक‘मात उपस्थित शिक्षक पुष्पा जायभाये, आशा लहाने, योगिता फुंदे, प्रकाश चंद्रवंशी, प्रमोद पवार, प्रकाश केंद्रे यांचाही सत्कार करण्यात आला. अवधूत कदम, दत्ता महाराज, कदम यांच्या अविरत सेवेसाठी त्यांचाही सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. गजानन शिंदे यांनी छत्रपती शंभुराजांच्या चाळीस दिवस छळाचा इतिहास मांडताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले. शंभुराजांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून इथे मावळा उभा राहिला, अटकेपासून कटकपर्यंत भगवा फडकला औरंगजेब याच मातीत गाडला, हा छत्रपती शंभुराजांचा जाज्वल्य इतिहास त्यांनी मांडला.
 
 
 
Venkataswami Maharaj  नारायण महाराजांनी धर्मासाठी कार्य व वारकरी परंपरा यावर प्रकाश टाकला. पुरुषोत्तम महाराजांनी संस्कृती, धर्मासाठी योगदान व एकजुटीची आवश्यकता बोलून दाखविली. महानुभाव महंत महिपाल बाबांनी जीवनात दुःख सांगायचं तर भगवंताला सांगा असे सांगून हिंदू धर्मासाठी कार्यकर्त्याची आवश्यकता यावर प्रकाश
 
 
Venkataswami Maharaj व्यंकटस्वामी महाराजांनी धर्माचरण, आपल्या मुलांना संस्कार, गोरक्षण, हिंदू धर्मासाठी एकजुटीचे आवाहन केले. हिंदू संमेलनाची आवश्यकता आणि जात व पंथभेद बाजूला सारून सर्वानी हिंदू धर्माच्या छताखाली एकसंघ येण्याचे आवाहन केले.प्रमुख वक्ते अनिल गांवडे यांनी पंचपरिवर्तनाची आवश्यकता व आचरणीय बाबींवर प्रकाश टाकला. परिवर्तन आणायचे असेल तर व्यक्तीनिर्माणाची आवश्यकता बोलून दाखविली. शिवराय, छत्रपती संभाजी महाराज व जिजामाता यांच्या प्रेरणादायी कार्याचे सदैव स्मरण करण्यास त्यांनी सांगितले. चिंचोली, बिटरगाव, मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी नवी, तिवडी जुनी या गावांतून नागरिक संमेलनाला उपस्थित होते. प्रसाद वितरणाने कार्यक‘माची सांगता झाली.
Powered By Sangraha 9.0