चांगदेव पासष्टी- एक प्रमेयातील प्रमेय

08 Mar 2026 19:55:32
- डॉ. कुसुमताई वांकर स्मृती व्याख्यान
 
नागपूर, 
Vidarbha Research Council विदर्भ संशोधन मंडळातर्फे डॉ. कुसुमताई वांकर यांच्या स्मृतीत ‘द फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया’चे महासंचालक डॉ. सुरेश चौधरी यांचे ‘चांगदेव पासष्टी - एक प्रमेयातीत प्रमेय’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. मदन कुलकर्णी यांनी डॉ. सुरेश चौधरी व सचिव डॉ राजेंद यांनी डॉ. पी. के. देशपांडे यांचे स्वागत केले. मंडळाचे कार्याध्यक्ष पराग पांढरीपांडे यांनी प्रास्ताविक केले.
 
 
vsm dks
 
Vidarbha Research Council  डॉ. पी.के. देशपांडे यांचा मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. देशपांडे यांनी भावनास्पर्शी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुरेश चौधरी यांनी चांगदेवांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवत ते किती महान योगी व होते याचा ऊहापोह केला. त्यांनी श्रोत्यांना चांगदेवांची योगिक योग्यता व गुणग‘ाहकता, अहंकार व योग्यता, सद्गुरूभाव व चांगदेव पासष्टी याबद्दल विस्तृत माहिती प्रस्तुत केली. बुद्धी, विवेक व प्रज्ञा यांना अगोचर असलेले चांगदेव पासष्टीचे सिद्धांत समजावून दिले. आधुनिक समाजाला उपयोगी चांगदेवांच्या जीवनमूल्यांची जाणीव करून दिली. प्रणव हळदे, रमाई पांढरीपांडे, संपत श्रीनिवासन, शिरवाळकर, सुनील झारखंडी, डॉ. चैतन्य भोरे व संदीप तिजारे यांनी कार्यक‘मासाठी मेहनत घेतली.
Powered By Sangraha 9.0