- जि.प. अध्यक्ष भेंडारकर यांचे प्रतिपादन
- जिल्ह्यातील आठही तालुक्यात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न
गोंदिया,
Z.P. Chairman Bhendarkar छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत नागरिकांना तत्परतेने सेवा पोहचविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव मंडळामध्ये रविवार ७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा पहिल्या टप्प्यातील प्रथम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भेंडारकर बोलत होते. या समाधान शिबिरात जि.प. सभापती पौर्णिमा ढेंगे, जि.प. सदस्य जयश्री देशमुख, पं.स. सदस्य नाजुक कुंभरे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे, तहसीलदार अनिरुध्द कांबळे, यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Z.P. Chairman Bhendarkar भेंडारकर पुढे म्हणाले, शासनाचे निर्णय, धोरण, योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अशाप्रकारच्या शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, रविवारी जिल्ह्यातील आठही तालुक्यात महाराजस्व समाधान शिबीर पार पडले. यात गोंदिया तालुक्यातील गोंदिया मंडळात आ. विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तर तिरोडा तालुक्यातील परसवाडा मंडळात उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड, गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली मंडळात निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, परिविक्षाधीन अधिकारी साईकिरण नंदाला यांच्या उपस्थितीत, देवरी तालुक्यातील ककोडी मंडळात आ. संजय पुराम, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, आमगाव तालुक्यातील तिगाव मंडळात नायब तहसीलदार वेलादी यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द मंडळात तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले व सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा मंडळात तहसीलदार प्रेरणा कटरे यांच्या उपस्थितीत शिबीराचे आयोजन करून लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.