आई - बहिणीवरून शिवी दिली तर ५०० रुपये दंड,

कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
अहिल्यानगर
ahilyanagar श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस आणि वेगळा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्यांना आळा घालण्यासाठी ग्रामसभेत थेट आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
 
 grampanchayat 
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी कोळगाव येथे विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महिलांनी गावातील सामाजिक वातावरणाबाबत चर्चा करत महिलांचा अपमान करणाऱ्या शिवीगाळीच्या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर उपाय म्हणून गावात कोणीही आई-बहिणींवरून शिवी दिल्यास त्या व्यक्तीकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
 
 दंडासाठी व्हिडिओ पुराव्याची अट
ahilyanagar या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी व्हिडिओ पुराव्याची अट ठेवण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास त्याच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.