या देशात राहणारा प्रत्येक माणूस हिंदू : आनंद पांडे

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
दारव्हा येथे विशाल हिंदू संमेलन

दारव्हा, 
जो या देशात राहतो, या भारताला आपली माता मानतो, तो हिंदू आहे. पूजा पद्धती, उपासना पद्धती वेगळी असेल तरी चालेल. ‘भारत माता की जय’ त्यांनी म्हटलं पाहिजे. भारत जिंकल्यानंतर ज्याला दु:ख होत असेल, पाकिस्तान हारल्यानंतर दुःख होत असेल तर तो देशद्रोही आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते Anand Pandey आनंद पांडे यांनी केले.
 
 
hindu dksl
 
दारव्हा शहरातील शिवाजीनगरातील विशाल हिंदू समाजात बोलताना ते पुढे म्हणाले, या देशाला आपला देश समजतो तो हिंदू आहे. हिंदू धर्म नसून ही संस्कृती आहे. जातीमधील सामाजिक समरसता दूर करत असताना आर्थिक विषमतासुद्धा दूर केली पाहिजे.
पूर्वी व्यवसायावरून जाती निर्माण झाल्या आणि त्यामुळे उच्चनीचता वाढली आणि आता आर्थिक विषमता तयार होत आहे. या सर्वांवर एकच उपाय आहे ती म्हणजे आपल्या विचारांमध्ये समरसता आणणे. आपल्या आचरणामध्ये समरसता आणण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
 
 
 
Anand Pandey आपल्याकडील सण उत्सवांमध्ये सर्व जाती, व्यवसायांच्या लोकांणा आपण बोलावलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्या घरात छोटे-छोटे हिंदू संमेलन होणे गरजेचे आहे, असेही मत आनंद पांडे यांनी व्यक्त केले. या हिंदू संमेलनाला हरिभक्त परायण विशाल महाराज बडे यांनी आशीर्वचन दिले. महिला दिनानिमित्त लाभलेल्या वक्ता आकाशा वर्मा महिलांना उद्देशून म्हणाल्या, या देशाचं भविष्य हे महिलांच्या हातामध्ये आहे. शिवबाला घडवणारी मातासुद्धा महिलाच होती. या संस्कृतीची व परंपरा जपणं हे महिलांचं काम आहे. मुली ज्या पद्धतीचे कपडे घालतात त्यात चिंतनाची आवश्यकता आहे. ‘लव्ह जिहाद’चे प्रमाण का वाढत आहे, आपण कुठे कमी पडतो, याचे चिंतन करणे गरजेचे आहे. या संमेलनाचे सूत्रसंचालन राम जाधव यांनी केले. प्रास्ताविक परिचय सतीश मांडेकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज उपस्थित होता. कार्यक्रमासाठी शिवाजीनगर वस्ती विशाल हिंदू संमेलन संचलन टोळी व आयोजन समितीने प्रयत्न केले.