नवी दिल्ली,
arshdeeps-mitchells-controversy २०२६ चा आयसीसी टी-२० वर्ल्ड कप नुकताच संपला असून भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकले. मात्र, सामन्यादरम्यान एका छोट्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
न्यूझीलंडच्या डावातील ११व्या षटकात भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि किवी फलंदाज डेरिल मिचेल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अर्शदीपने मिचेलच्या मारलेल्या चेंडूवर प्रतिसाद देताना तो चेंडू चुकून मिचेलला लागला. यावर मिचेल संतापला आणि पुढे सरसावला, तर अर्शदीप आपल्या रन-अपवर परतला. दोन्ही खेळाडूंमधील तणाव पाहून मैदान गरम झाले. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव तातडीने धावून आला आणि मिचेलची समजूत काढली. पंचांनी अर्शदीपशी संवाद साधत मैदानावर शांतता प्रस्थापित केली. arshdeeps-mitchells-controversy अखेरीस दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन करून खेळाडूवृत्ती दाखवली आणि सामना पुन्हा सुरू झाला.
सौजन्य : सोशल मीडिया
फलंदाजीमध्ये भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. संजू सॅमसन, ईशान किशन आणि अभिषेक शर्माच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला. arshdeeps-mitchells-controversy अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या घातक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव तग धरू शकला नाही. अखेर भारताने ९६ धावांनी विजय मिळवत विश्वचषक उंचावला.