भविष्यात भारत जगाचं नेतृत्व करेल : आशिष प्रतापवार

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
इरथळ येथे विशाल हिंदू संमेलन

दारव्हा, 
भारतीय संस्कृती ही सनातन संस्कृती असून या संस्कृतीने जगाला दिशा देण्याचे काम केले आहे. कारण आपली संस्कृती ही ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना ठेवणारी आहे. आपल्या संतांनी तर ‘हे विश्वची माझे घर’, हे विश्वच आमचा परिवार आहे, आता विश्वात्मके देवे, अशा शब्दांत या समस्त विश्वाची आणि मानवाच्या कल्याणाची कामना केली आहे. भारतीय संस्कृती भारतीय परंपरा जगाला हेवा वाटावी अशी आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते Ashish Pratapwar आशिष प्रतापवार यांनी केले.
 
 
pratap war
 
Ashish Pratapwar  दारव्हा तालुक्यात इरथळ येथे पार पडलेल्या विशाल हिंदू संमेलनात ते पुढे म्हणाले, अशा संस्कृतीचे आपण सर्व पाईक आहोत याची जाणीव, जागृती अशा हिंदू संमेलनांच्या माध्यमातून होत असते. म्हणून संघ शताब्दी निमित्त समाज असे नियोजन करीत आहोत. जगाच्या पाठीवर भारत असा देश आहे ज्याला माता म्हणून संबोधले जाते. म्हणून आपण या देशात राहणारी प्रत्येक व्यक्ती या भारतमातेचे पुत्र आहोत. आपली पुत्रवत जबाबदारी आहे. या देशाला बलशाली राष्ट्र बनविणे ही जबाबदारी सर्वांवर आहे, असे आशिष प्रतापवार म्हणाले. या संमेलनाला धर्माचार्य म्हणून लाभलेले श्रीक्षेत्र निरंजन माहूरगड येथील महंत रमणपुरी महाराज यांचं आशीर्वचन सर्वांना लाभलं. त्या आधी भुलाई मंडळातील इरथळ या गावामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या भव्य शोभायात्रेला ग्रामवासींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय जिल्हा बौद्धिक प्रमुख गोपीचंद चव्हाण यांनी व सूत्रसंचालन मोहन आडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भुलाई मंडळाची आयोजन समिती व संचालन समिती यांचा विशेष योगदान होते.