हिंगणघाटला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्या

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
शप गटाचे जिल्हाध्यक्ष वांदिले यांची मागणी
 
हिंगणघाट, 
हिंगणघाटला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा व प्रस्तावित ११ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या यादीत हिंगणघाटचा समावेश करण्याच्या मागणीसाठी शप गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याशी वर्धा जिल्हाध्यक्ष Atul Vandile अतुल वांदिले यांनी चर्चा करीत निवेदन दिले. हिंगणघाट हे चार जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अवघ्या १५ किमीवर तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमा सुमारे ३० किमी अंतरावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील बेला, सिर्सी तसेच वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे, समुद्रपूर आदी भाग हिंगणघाटच्या जवळ आहेत.
 
 
Atul Vandile
 
Atul Vandile हिंगणघाट हे ऐतिहासिक, औद्योगिक, व्यापारी व कृषी दृष्ट्या महत्त्वपूर्ण शहर असून महसूल संकलनात अग्रस्थानी असलेला उपविभाग आहे. भौगोलिकदृष्ट्या हे शहर चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेजवळ मध्यवर्ती ठिकाणी आहे. वाढती लोकसंख्या, कृषी उत्पन्न बाजार समितीची मोठी उलाढाल, औद्योगिक परंपरा, अतिरित जिल्हा सत्र न्यायालय व केंद्र शासनाकडून मंजूर वैद्यकीय महाविद्यालयामुळे हिंगणघाटची प्रशासकीय क्षमता सिद्ध झाली आहे. लगतच्या तालुयांतील नागरिकांची दैनंदिन बाजारपेठ हिंगणघाटशी जोडलेली असली तरी प्रशासकीय कामांसाठी त्यांना दूरवरच्या त्या-त्या जिल्हा मुख्यालयात जावे लागते. यामुळे वेळ, पैसा व श्रम यांचा अपव्यय होत असून विकासाच्या गतीवर मर्यादा येत आहेत. प्रशासन अधिक परिणामकारक, सुलभ व लोकाभिमुख करण्यासाठी हिंगणघाटला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देणे अत्यावश्यक आहे. तसेच राज्यात प्रस्तावित ११ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या यादीत हिंगणघाटचा समावेश करून येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.