अनिल कांबळे
नागपूर,
betting on t20 world cup भारत विरुद्ध न्यूझीलंड या टी-२० वर्ल्ड कप-२०२६ मधील रोमांचक सामन्यावर सट्टा लावणा-या टोळीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ च्या पथकाने कारवाई केली. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गीतानगर परिसरात सुरू असलेल्या या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. चैतन्यकुमार गंगाराम ठाकरे (५५, ईतवारी), पुरुषोत्तम दशरथ सोनकुसरे (५३, वाठोडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, रविवारी रात्री ९.२० ते ९ मार्चच्या मध्यरात्री १२.२० च्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाला मानकापूरमधील ठाकरे ले-आऊट, गीतानगर येथील शर्मा नावाच्या व्यक्तीच्या घराच्या वरच्या मजल्यावर काही लोक क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी येथे सापळा रचून धाड टाकली. छापेमारीत पोलिसांनी चैतन्यकुमार ठाकरे आणि पुरुषोत्तम थ सोनकुसरे या दोघांना ताब्यात घेतले. कारवाईत पोलिसांनी एक टीव्ही संच, १० मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण १ लाख ३८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.betting on t20 world cup पकडण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे साथीदार संजू रामटेकेकर, हेमराज नामदेवराव कोहाड (दोन्ही रा. नंदनवन) आणि अविनाश खडके (लालगंज) यांच्या मदतीने हा सट्टा अड्डा चालवत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सर्वांविरूद्घ मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.