वीज कामगारांसोबत महिला दिन साजरा

09 Mar 2026 14:40:57
नागपूर,
electricity workers जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, नागपूर यांच्या वतीने विमल कॉम्प्लेक्स, घाट रोड कार्यालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद रीता ठाकरे यांनी भूषविले. यावेळी मंचावर महासंघाचे कार्याध्यक्ष संजय दंडारे, महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रदेश महामंत्री शंकर पहाडे, आणि महासंघाच्या सचिव गीतांजली राणे उपस्थित होत्या.
 
electricity workers
 
सर्वप्रथम मंचासीन पदाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानंतर विद्या उईके यांनी श्रमिक गीत सादर केले. मंचासीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले, तसेच सर्व उपस्थित महिलांना सन्मानार्थ गुलाब पुष्प प्रदान केले गेले. प्रास्ताविक ज्योति मडावी यांनी सादर केले. त्यानंतर उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर मंचावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. electricity workers अध्यक्षीय मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्ष रीता ठाकरे यांनी केले. आभार वर्षा निकोडे यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कारीकर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशांक गर्गे आणि कमलेश मांडवगडे यांनी सहकार्य केले.
सौजन्य: शंकर पहाडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0