डॉ. दिव्या अग्रवाल देशात प्रथम

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
डीएनबी क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये यश
चांदूर रेल्वे, 
Dr. Divya Agarwal येथील राधेश्याम ऑईल इंडस्ट्रीजचे संचालक गजानन मोतीलाल अग्रवाल यांची सून डॉ. दिव्या बलराम अग्रवाल यांनी डीएनबी क्रिटिकल केअर मेडिसिन या अत्यंत प्रतिष्ठित आणि कठीण समजल्या जाणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक (ऑल इंडिया १ फर्स्ट रैंक) मिळवून उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
 
 
dissh
 
Dr. Divya Agarwal वैद्यकीय क्षेत्रातील ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण मानली जाते. देशभरातील अनेक प्रतिभावान डॉक्टर या परीक्षेसाठी प्रयत्न करतात. अशा स्पर्धात्मक वातावरणात डॉ. दिव्या यांनी देशात अव्वल क्रमांक मिळवत आपल्या कुटुंबाचे, गुरूजनांचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. दिव्या यांचे शालेय जीवन सुरुवातीपासूनच अत्यंत उज्ज्वल राहिले आहे. त्यांनी सन २००९ मध्ये रांची येथील लोरेटो कॉन्व्हेंट स्कूल मधून आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवत झारखंड राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी जवाहर विद्या मंदिर, श्यामली (सीबीएसई बोर्ड) येथून २०११ मध्ये बारावीची परीक्षा ८६ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेत जेएसएस मेडिकल कॉलेज, म्हैसूर येथून २०१७ मध्ये एमबीबीएस पदवी संपादन केली. शिक्षणादरम्यान त्यांनी उत्कृष्ट प्राविण्य सिद्ध करत पॅथॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री या विषयांमध्ये दोन गोल्ड मेडल मिळवली. देशात कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी आयसीयूमध्ये कार्यरत राहून गंभीर रुग्णांची सेवा केली. त्यानंतरत्यांनी उच्च शिक्षणासाठी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम येथे प्रवेश घेतला आणि २०२१ मध्ये एमडी (अ‍ॅनेस्थेशिया) ही पदवी ७२ टक्के गुणांसह पूर्ण केली. त्यांचे पती डॉ. बलराम हे देखील वैद्यकीय क्षेत्रात आहेत. सध्या ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर येथे डीएनबी मेडिकल ऑन्कोलॉजीचे (लास्ट इयर) शिक्षण घेत आहेत. डॉ. दिव्या यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन, नवी दिल्ली अंतर्गत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे एनबी क्रिटिकल केअर मेडिसिनचे शिक्षण पूर्ण केले. सन २०२६ मध्ये झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत त्यांनी संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळवत नॅशनल टॉपर होण्याचा मान मिळवला. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे चांदूर रेल्वे परिसराचा मान देशपातळीवर उंचावला असून तरुण पिढीसाठीही हे यश प्रेरणादायी ठरत आहे.