दिल्लीजवळ भूकंपाचे धक्के; रेवाडी परिसरात सकाळी हादरला

09 Mar 2026 10:14:56
नवी दिल्ली,
Earthquake tremors felt near Delhi सोमवारी सकाळी राजधानी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नवी दिल्ली आणि आसपासच्या भागातील नागरिकांना हलकी कंपने जाणवल्याने अनेक जण काही काळासाठी घराबाहेर आले. या भूकंपाचे केंद्र हरियाणातील रेवाडी येथे असल्याची माहिती मिळाली आहे.
 
 
g676
 
सकाळी सुमारे सात वाजून एक मिनिटांनी हे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर मापन पद्धतीनुसार २.८ इतकी नोंदवली गेली. तीव्रता कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अचानक जाणवलेल्या कंपांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र परिस्थिती लवकरच सामान्य झाली. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून कोणतीही गंभीर घटना घडलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0