मालेगाव,
तालुयातील मौजे अमानी येथील युवा Farmer suicide शेतकरी मदन ज्ञानबा खडसे वय ४५ या शेतकर्याने आपल्या स्वतःच्या शेतात जाऊन विषारी औषध घेऊन, आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली. अमानी गावापासून दोन-तीन किलोमीटर आंतररावर असलेल्या स्वतःच्या गट क्रमांक ३४६ क्षेत्रफळ १:६२असलेल्या आपल्या मालकीच्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ मार्च रोजी सकाळी घडली असून मदन खडसे, यांच्यावर बँकेचे कर्ज आहे.
Farmer suicide त्यांच्या मुलीचे अवघ्या दोन महिन्यावर लग्न असताना परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. मदन खडसे यांच्या परिवारात अपंग वडील, आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असून मदन यांनी आपली जीवन यात्रा संपल्यामुळे गावातसर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मालेगाव पोलिस स्टेशनला त्यांच्या परिवाराच्या वतीने फिर्याद नोंदवली. तसेच संबंधित तलाठी यांनी देखील तसा अहवाल तहसील कार्यालयात सादर केला.