नागपूरमध्ये महिला दिनानिमित्त मेळावा

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Womens Day in Nagpur जागतिक महिला दिनानिमित्त धनगर अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, नागपूर शाखा यांनी बालाजी नगर येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले. कार्यक्रमाचा उद्देश समाजातील महिलांचे सक्षमीकरण, उद्योजकता, आरोग्य मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महिलांना प्रोत्साहन देणे होता. कार्यक्रमात अनुराधा थोटे यांनी प्रास्ताविक सादर केले, तर नीता प्रफुल्ल औघड (सहायक आयुक्त, कौशल्य विकास विभाग) उदघाटक म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षीय मार्गदर्शन प्रा. नलिनी चंद्रकांत ढोले यांनी केले, तर डॉ. वर्षा ढवळे, डॉ. नयना पाटील, डॉ. शोभना बिटे यांनी स्त्री व आरोग्य संबंधित मार्गदर्शन केले.
 
Nagpur
 
महिलांसाठी “सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांमध्ये संधी” आणि “किशोरवयीन मुलींचे शारीरिक व मानसिक आरोग्य” या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्या. Womens Day in Nagpur सांस्कृतिक कार्यक्रमांत नाटिका, गायन आणि नृत्याद्वारे महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शीतल गावंडे, वैशाली कातरे, वनिता चिडे, आशा माहुरे आणि महिला आघाडीच्या सहभागाने यशस्वी झाला. राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले, जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र बुधे व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
सौजन्य: उज्वल रोकडे, संपर्क मित्र