उत्तर नागपूर बुध्द विहार महिलांचा भव्य सत्कार

09 Mar 2026 17:19:53
नागपूर,
North Nagpur Buddha Vihar जागतिक महिला दिनानिमित्त दिक्षाभुमी एज्युकेशन ॲड चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित उत्तर नागपूर बुध्द विहार महिला कमिटीचा भव्य सत्कार समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेन्शन सेंटर, कामठी रोड, नागपूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सचिन टेंभुर्णे आणि रमेश वानखेडे यांनी केले. उत्तर नागपूर येथील ८० बुध्द विहारच्या महिलांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दीप प्रज्वलन आणि संविधानाची उद्देशिका सामूहिक पठन करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना, संकल्पना आणि नियोजन सचिन टेंभुर्णे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. मनिषा घोष यांनी केले.
 
North Nagpur
 
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक आयुष्यमती शितल सिरसाठ (वानखेडे), विभागीय वाहतूक अधिकारी भंडारा–गोंदिया, आयुष्यमती डॉ. राजरत्ना रामटेके आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश वानखेडे यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. North Nagpur Buddha Vihar विविध मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात चैताली रामटेके यांनी पुढाकार घेतला, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने उत्तर नागपूर येथील महिला आणि पुरुष उपस्थित होते, ज्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
 
सौजन्य: चैताली रामटेके, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0