गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरण मोहिम

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
कर्करोग लसीकरणासाठी खाजगी शाळामध्येही जनजागृती करणार
नागपूर,
HPV vaccination campaign  १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना देण्यात येणार्‍या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवारी जयताळा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते झाला. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालल्याने मनपाच्या शाळांसोबतच खासगी शाळांमध्येही या लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन महापौर निता ठाकरे यावेळी केले.
 
 
nmc-lasikaran-1
 
याप्रसंगी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे,मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, नगरसेविका कुमुदिनी गुडधे पाटील, नगरसेवक शैलेंद्र डोरले, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदी उपस्थित होते.

एचपीव्ही लसीकरण महत्त्वाचे
बोलताना महापौर म्हणाल्या, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा दिवसेंदिवस वाढत असून, त्यावरील प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मनपाच्या शाळांसोबतच खाजगी शाळांमध्येही या लसीकरण मोहिमेबाबत व्यापक जनजागृती करावी. तसेच येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरातील १४ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलींना लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व शिक्षकांनी समन्वयाने काम
लसीकरणाबाबत काही ठिकाणी अपप्रचार होत असल्याचे निदर्शनास आले असून, ही लस सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण केल्यानंतरच देण्यात येत आहे, आणि ती सुरक्षित आहे असेही महापौरांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर अपप्रचार करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच जनजागृती करणार्‍या इन्फ्लुएन्सर्सना प्रोत्साहन देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

पालकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक
HPV vaccination campaign आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले की, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींच्या पालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी प्राधान्याने काम करावे असे त्यांनी निर्देश दिले. आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे यांनी यावेळी सांगितले की, लसीकरण मोहिमेसाठी पुरेसा साठा करून देणे तसेच लसीबाबत कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.