विजयाचा जल्लोष जीवावर बेतला

09 Mar 2026 16:23:18
पुणे,
India ICC T20 World Cup टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने विजेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्र आनंदात न्हालेला दिसला, मात्र काही ठिकाणी हा जल्लोष तणावाच्या घटनांमध्ये रूपांतरित झाला. सांगली, पुणे, अकोला आणि अमरावतीमध्ये काही घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले.
 

India ICC T20 World Cup 2026 victory, India vs New Zealand final, 
सांगलीत मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात विजय साजरा करण्यासाठी हजारो नागरिक जमले होते. सुरुवातीला शांततेत चाललेला जल्लोष काही तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे तणावात बदलला. पोलिसांनी वारंवार सूचना दिल्या, पण गोंधळ थांबत नसल्यामुळे त्यांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली. यामुळे परिसरात काही वेळा तणाव निर्माण झाला.
तसेच, सांगली शहरात मारुती चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मोठी दुर्घटना टळली. फटाक्यांची ठिणगी एका दुकानाच्या छतावरील पालापाचोळ्यावर पडल्याने आग लागली, मात्र फायरमन प्रसाद माने आणि त्यांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत आग विझवली, ज्यामुळे मोठी वित्तहानी टळली.
अकोल्यातील India ICC T20 World Cup हरिहरपेठ भागात फटाके फोडण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि ही दगडफेकीत रूपांतरित झाली. सोनटक्के प्लॉट व गाडगेनगर भागात झालेल्या दगडफेकीत चारचाकी वाहनांची तोडफोड झाली. या घटनेत २-३ नागरिक आणि काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली, तर दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.पुण्यातील फर्ग्युसन रोडवर तरुणांनी विजयोत्सव साजरा करत हुल्लडबाजी केली. गर्दी आणि गोंधळामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून तरुणांना पांगवले.अमरावतीत राजकमल चौकात काही तरुणांनी एकमेकांच्या अंगावर फटाके फेकत जल्लोष केला. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून मोठा बंदोबस्त तैनात केला आणि गर्दी पांगवली. धुळे शहरात तरुणांनी ढोल-ताशा व डीजेच्या तालावर नाचत विजयाचा आनंद साजरा केला. भंडाऱ्यातील मुस्लिम लायब्ररी चौकातही क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.या घटनांनी दाखवून दिले की, विजयोत्सवाच्या जल्लोषातही सुरक्षिततेचे नियम पाळणे आणि नियंत्रित वातावरण राखणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0