अंतिम सामन्यापूर्वी राष्ट्रगीतात रडताना दिसला न्यूझीलंडचा खेळाडू; भारताशी खास नातंVIDEO

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
ish-sodhi-new-zealand-cricketer-crying टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. सामन्याच्या प्रारंभी राष्ट्रगीत सुरू असताना न्यूझीलंडचा अनुभवी फिरकीपटू ईश सोधी भावूक झाला. दोन्ही संघ मैदानावर उभे असताना ईश सोधीच्या डोळ्यांत अश्रू दिसले आणि त्याने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, परंतु भावना लपवता आल्या नाहीत.
 
ish-sodhi-new-zealand-cricketer-crying
 
या भावनिक क्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी ईश सोधीच्या भावनांचे कौतुक केले, काहींनी हा क्षण खेळाडूंच्या देशभक्तीचे प्रतीक असल्याचेही सांगितले. ईश सोधीचा भारताशीही एक खास नाते आहे. ish-sodhi-new-zealand-cricketer-crying त्यांचा जन्म लुधियाना, भारतात झाला, मात्र नंतर त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. भारतीय मुळे असूनही तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतो. या कारणामुळे भारतीय चाहत्यांमध्येही त्याबद्दल वेगळी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सौजन्य : सोशल मीडिया