अन्नत्याग सत्याग्रहाच्या पाचव्या दिवशी ‘अर्धनग्न आंदोलन’

09 Mar 2026 20:23:21
खा. धानोरकर, आ. अडबाले यांची उपोषण मंडपास भेट
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मागण्या

चंद्रपूर, 
जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणार्‍या‘Lohardongri’ mining project  ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचा सोमवारी पाचवा दिवस होता. या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनस्थळी ‘अर्धनग्न आंदोलन’ करण्यात आले.
 
 
Lohardongri’
 
Lohardongri’ mining project  अर्धनग्न आंदोलनामध्ये योगेश दुधपचारे, अविनाश पोईनकर, अब्दुल जावेद, अनिल अडगुरवार, आकाश घोडमारे, गौरव कुषमवार, कुणाल देवगीरकर, सुनील पाटील, धर्मेंद्र लुणावत, सुमित कोहळे, सुनील लिपटे, विजय हेडाऊ, सचिन धोतरे, राजू काहिलकर, हरीश मेश्राम, सनी दुर्गे, रुद्राक्ष धोतरे, संदीप इंगोले, किशोर जामदार आदी सहभागी झाले होते. सोमवारी उपोषण मंडमपास रोटरी क्लब, जिजाऊ ब्रिगेड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिआयटीयू, संभाजी ब्रिगेड यांनी भेट दिली. तर रविवारी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, डॉ. अशोक जिवतोडे यांनी भेट देत समर्थन जाहीर केले. मधुसूदन रुंगठा, वर्षा जामदार, जयश्री कापसे, रमेशचंद्र दहिवडे, अर्चना चौधरी, दिलीप चौधरी, अतुल वासुदेव, डॉ. विजय आईंचवार, मनीष बोराडे, राजेश पिंजरकर, लुकेश निमगडे, गंगासागर हेटी, संदीप रामटेके, संतोष तेलंग, निखिल तांबेकर, परशुराम तोडासे आदींनीही मंडपास भेट दिली.
 
आज आंदोलनस्थळी ‘शोक कवी संमेलन’
धोतरे यांचे 5 मार्च पासून अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपूरातील सर्व साहित्यिक संस्था, संघटनांतर्फे मंगळवार, 10 मार्च रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘शोक कवी संमेलन’ आयोजित केले आहे. या ‘शोक कवी संमेलना’त सर्व लेखक, कवी, संवेदनशील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0