खमेनाई यांच्या निधनानंतर पुत्र मोजतबा सर्वोच्च नेते!

09 Mar 2026 10:18:50
तेहरान,
Mojtaba Supreme Leader इराणमध्ये सत्ताबदलाचा महत्त्वाचा टप्पा पाहायला मिळाला आहे. देशाचे सर्वोच्च धार्मिक नेते अली खमेनाई यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खमेनाई यांची नव्या सर्वोच्च नेत्याच्या पदावर निवड करण्यात आली आहे. इराणमधील धार्मिक नेत्यांची ८८ सदस्यांची परिषद असलेल्या तज्ज्ञांच्या सभेने निर्णायक मतांनी हा निर्णय घेतला. यानंतर मोजतबा खमेनाई हे देशाचे तिसरे सर्वोच्च नेते म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
 
 

Mojtaba Supreme Leader 
 
नाव जाहीर होताच इराणमधील लष्कर, तसेच इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि राजकीय नेतृत्वाने तातडीने नव्या नेत्याप्रती निष्ठा व्यक्त केली. संरक्षण यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नव्या नेत्यांच्या आदेशांचे पालन करण्यासाठी तसेच देशासाठी कोणतेही बलिदान देण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले. संसदेच्या अध्यक्षांनी या निर्णयाला धार्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्य असे संबोधले, तर सुरक्षा यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशासमोर उभ्या असलेल्या आव्हानात्मक काळात नवे नेते योग्य मार्गदर्शन करतील असा विश्वास व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0