-एमआयडीसी पोलिसांची कारवाई
हिंगणा,
Motorcycle thief नागपूर शहरातील विविध भागातून मोटरसायकल त्या विक्री करणार्या चोराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल १८ मोटरसायकली जप्त केल्या असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवेश कन्हैयालाल कंगाले (३८, रा. पोलिस लाईन टाकळी, नागपूर ह. मु.अमर नगर, निलडोह हिंगणा रोड नागपूर )असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी प्रवेशने एमआयडीसी तसेच शहरातील विविध ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकल चोरी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी लॉक तोडून तो ग्रामीण भागात निर्जन ठिकाणी नेऊन लपवित होता. त्यानंतर त्यासाठी ग्राहक बघून किंवा कबाडीवाल्यांकडे ती विकायचा. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोर्या वाढल्या होत्या. सदर गुन्हयाचे तपासाकरिता व आरोपी चा शोध घेण्यासाठी ठाणेदार गोकुळ महाजन यांनी पथक तयार केले होते.
Motorcycle thief दरम्यान, गुप्त बातमीदारा मार्फत माहिती आणि तसेच तात्रींक सीसीटीव्ही तपासणी मध्ये सदर आरोपी चोरी झालेल्या दोन तीन ठिकाणी आढळला.त्यानंतर आरोपीला ताब्यात घेवुन बारकाईन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीकडून एकुण १८ दुचाकी वाहने जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई ी परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त सिंगा ऋशिकेश रेड्डी, सहायक पोलिस आयुक्त सतिश गुरव, ठाणेदार गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनात सपोनि हेंमत कोकनी, सपोनि संजय बनसोड व तपास पथक उपनिरीक्षक पंकज सयाम यांनी केली आहे.