महिला बचतगटाची भरारी : कविता येवले यांचा पुढाकार
दारव्हा,
Mushroom production business उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दारव्हा तालुक्यातील पाळोदी येथील नवदुर्गा स्वयंसहाय्य महिला बचतगटाच्या कविता येवले यांनी मशरूम उत्पादन व्यवसायातून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. पाळोदी येथील रहिवासी येवले या स्वप्नपूर्तीनगर येथे वास्तव्यास असून त्यांनी स्वतःच्या घरातूनच हा उद्योग उभारला आहे. त्यांनी 17 सप्टेंबर 2021 रोजी मशरूम उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला. मशरूम पावडर, मशरूम चॉकलेट आणि चहा मसाला यांसारखी विविध उत्पादने तयार करून त्या बाजारपेठेत विक्री करीत आहेत. गुणवत्तेमुळे या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून मागणीही वाढत आहे.
Mushroom production business मशरूम लागवडीसाठी त्या सोयाबीनच्या कुटारापासून बेड तयार करतात आणि त्यावर मशरूमची लागवड करतात. मशरूम उत्पादन पूर्ण झाल्यानंतर त्याच बेडचा वापर करून त्या गांडूळ खताची निर्मिती करतात. या सेंद्रिय खताची बाजारात 40 रुपये किलो दराने विक्री होते. मात्र दारव्हा तालुक्यातील शेतकèयांना प्रोत्साहन म्हणून हेच खत त्या 20 रुपये किलो दराने उपलब्ध करून देतात.
या व्यवसायासाठी सुरुवातीला त्यांनी सुमारे 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनी सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत नफा मिळवला आहे. व्यवसायाला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता त्यांची गुंतवणूक आणि नफा दोन्ही सातत्याने वाढत आहेत.
Mushroom production business व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्या मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती आणि यवतमाळ येथे भरविण्यात येणाèया विविध प्रदर्शनांमध्ये स्टॉल्स लावून आपल्या उत्पादनांची विक्री करतात. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी उद्योजकतेचा प्रेरणादायी मार्ग निर्माण होत आहे.
प्रदर्शनांतून वाढली ओळख
मशरूम उत्पादनाच्या व्यवसायाला मोठी बाजारपेठ मिळावी यासाठी कविता येवले विविध शहरांमध्ये भरविल्या जाणाèया प्रदर्शनांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती आणि यवतमाळ येथे त्यांनी स्टॉल लावून मशरूम पावडर, चॉकलेट आणि चहा मसाला यांसारखी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहेत. प्रदर्शनांमधील प्रतिसादामुळे त्यांच्या उत्पादनांची ओळख वाढली असून नवीन ग्राहक आणि व्यापारी यांच्याशीही संपर्क निर्माण झाला आहे.
स्वावलंबनाची प्रेरणादायी वाट
घरातून सुरू झालेल्या छोट्या उपक्रमातून कविता येवले यांनी सातत्य, मेहनत आणि नवीन कल्पनांच्या जोरावर व्यवसाय उभा केला आहे. मशरूम उत्पादनासोबतच गांडूळ खत निर्मिती करून त्यांनी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर केला. कमी गुंतवणुकीतून सुरू झालेला हा उद्योग आज विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळत आहे.