नागपूर,
Nagpur News क्रिकेटप्रेमी जयराज सरमुकद्दम याच्या क्रिकेटवेड्या प्रेमासाठी त्याचे वडील मुकुंद सरमुकद्दम आणि आई शैला यांनी एक खास उपक्रम राबवला. जयराजसाठी २०-२० फायनल मॅचचे आयोजन करण्यात आले, जिथे हॉल बुक करून मोठ्ठा LED स्क्रीन, वायफाय कनेक्शन, तीन महिन्यांचे Jio सबस्क्रिप्शन, दीडशेच्या वर खुर्च्या, प्रत्येक प्रेक्षकाला केशरी कॅप, हनुमान चालीसा, तसेच महिला दिनानिमित्त ५ महिलांचा सत्कार करण्यात आला.
मॅचदरम्यान प्रेक्षकांना चहा, कॉफी, बिस्कीट, मध्यंतरात वडापाव व पुलाव, आणि मॅच जिंकल्यावर आइसक्रीम दिला गेला. कार्यक्रमात जय श्रीराम, वंदे मातरम आणि भारत माता की जयचे उत्स्फूर्त नारे उमटले. Nagpur News जयराजसाठी हा अनुभव आनंददायी ठरला आणि त्याच्या क्रिकेटप्रेमाचा उत्साह आणखी वाढवला.
सौजन्य: रवी वाघमारे, संपर्क मित्र