नवभारत संस्थेने केला महिला दिन साजरा

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Navbharat Sanstha नवभारत बहुउद्देशीय संस्था, नरेंद्र नगर यांनी जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रज्ञा पुसदकर, शीला अगस्ती, पद्मश्री माहुरकर आणि सुहास माहुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर रितिका दलाल आणि चमूच्या कथ्थकाद्वारे दुर्गादेवी वंदना सादर करण्यात आली.

Navbharat Sanstha
कार्यक्रमात प्रचिती धोंड यांनी आदरणीय मावशी केळकर यांच्या जीवनावर आधारित कीर्तन सादर केले. त्यांनी मावशींच्या आदर्श जीवनाचा आढावा घेतला आणि देशसेवेच्या मार्गावर दास्यभावना किती महत्त्वाची असते हे उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी शर्वरी पुसदकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले, Navbharat Sanstha तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या संयोजिका पद्मश्री माहुरकर, सुहास माहुरकर आणि शीला अगस्ती यांनी कठोर परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन आणि अल्पोपहाराद्वारे केला गेला, आणि महिला दिन उत्साहात साजरा झाला.
सौजन्य: प्रज्ञा पुसदकर, संपर्क मित्र