नेरी (पुनर्वसन)चा पाणी प्रश्नासाठी उपोषण

09 Mar 2026 20:27:11
वर्धा, 
तालुयातील पुनर्वसित नेरी ग्रामपंचायत अस्तित्त्वात आल्यापासून येथे पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. गावात दोन-तीन विहिरी आहेत. मात्र, एका विहिरीलगतच सांडपाण्याचा नाला जात असून नाल्यातील सांडपाण्याचा पाझर हा पूर्णपणे विहिरीत जाऊन दूषित पाणीपुरवठा होत असते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोयात आले असून Neri (Rehabilitation) नेरी (पुनर्वसन) येथील पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी आज सोमवार ९ रोजी गावकर्‍यांनी केली. येत्या दोन-तीन दिवसात हा प्रश्न न सुटल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांना निवेदनातून दिला आहे.
 
 
neri
 
Neri (Rehabilitation)  नेरी (पुनर्वसन) गावाला पाणी पुरवठा योजनेंतर्गत सालोड ते धोत्रा रोड येथे विहिरीच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात आली. परंतु, वर्धा ते सावंगीमधून वाहत असलेल्या सांडपाण्याचा नाला अगदी पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीलगत असल्यामुळे सांडपाण्याचा पाझर हा पूर्णत: विहिरीमध्ये जातो. त्यामुळे या विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. पंस व जिप कार्यालयातील आरोग्य कर्मचार्‍यांनी विहिरीतील पाण्याचे नमूने घेतले असता पाणी दूषित असल्याचा अहवाल ग्रामपंचायतकडे आहे. ते पाणी पिण्यायोग्य नसल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे एक वर्षभरापासून धोत्रा मार्गावरील विहिरीचा उपयोग बंद करण्यात आला. गावातील विहिरीवरूनच पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, गावाला पुरेल इतके पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे डिसेंबर महिन्यातच पाण्याची टंचाई निर्माण होते.
 
 
Neri (Rehabilitation) दोन महिन्यांपूर्वी पाणीपुरवठासंदर्भात बैठक झाली असता नवीन विहीर व पाण्याची तात्काळ सोय करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे करण्यात आली होती. यासोबतच जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन देऊन गावातील पाणी प्रश्न मांडला होता. मात्र, अद्यापही यावर कोणतीही कारवाई जिल्हा प्रशासनाने केली नाही. सन २०२४ मध्ये पाणी टंचाईच्या बैठकीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना नवीन विहिरीची मागणी केली असता जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी विहीर मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. तसा ग्रापंने प्रस्तावही पाठविला. मात्र, एक वर्ष लोटूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. दरम्यान, जनता दरबारमध्ये पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याशी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाणी प्रश्नावर त्वरित निर्णय घेऊन कारवाई करण्याचे सूचविले. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना करीत बोर तयार करून पुढील सहा महिन्यांच्या आत नवीन विहीर तयार करून देण्याच्या सूचना केल्या. मात्र, अजूनही नागरिकांना पाण्यासाठी तडजोडच करावी लागत आहे. दरम्यान, गावातील पाणी प्रश्न मिटविण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. निवेदन देतेवेळी सरपंच प्रवीणा काळबांडे, ज्ञानेश्वर चाफले, संगीता कस्तुरे, संघदीप नाखले, डॉ. रामकृष्ण मिरगे, सुमित हेंडवे, सरस्वती पाटील, वंदना निस्ताने, देवराव क्षीरसागर, सुशील बन्सोड, छाया देशमुख, अंकुश गडलिंग आदींची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0