युद्धाची भीषणता...तेहरानमध्ये तेलमिश्रित पाऊस!

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
तेहरान,
Oily rain in Tehran इराणची राजधानी तेहरानमधील घाएम मकाम फरहानी रस्त्यावर चिंताजनक दृश्य पाहायला मिळाले. शहरात पडलेल्या पावसात तेल मिसळल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. नेहमीप्रमाणे जीवनदायी ठरणारा पाऊस नसून या पावसात प्रदूषणाचे अंश मोठ्या प्रमाणात आढळत असल्याची चर्चा आहे. या पावसामुळे रस्ते, इमारती आणि वाहनांवर काळसर तेलकट थर दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांनी याला पर्यावरणासाठी गंभीर इशारा असल्याचे सांगितले आहे.
 
 
Oily rain in Tehra
 
 
साधारणपणे पाऊस हा माणसे, शेती, झाडे, प्राणी आणि संपूर्ण निसर्गाला जीवन देणारा असतो. मात्र या घटनेत पावसाबरोबर तेल आणि प्रदूषित घटक मिसळल्याने परिस्थिती वेगळीच निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचा पाऊस पर्यावरणासाठी तसेच मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. हवेत असलेल्या धूर, रसायने किंवा तेलकट कण पावसाच्या थेंबांसोबत खाली पडल्यास अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या घटनेला पर्यावरणीय संकट म्हणूनही पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही सांगितले जात आहे.