पांडे लेआउटमध्ये महिला दिनानिमित्त कवी संमेलन

09 Mar 2026 16:50:59
नागपूर,
Pandey Layout पांडे लेआउट येथील महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन केले. या संमेलनात कवियत्री आणि लेखिका  माया कारगिलवार यांनी “स्त्री म्हणजे माया, शक्ती, संयम आणि प्रेरणा” असा संदेश देत घर, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे अमूल्य योगदान कवितेतून मांडले.
 
Pandey Layout
 
यावेळी सविता खोरगडे, रचना जैन, प्रज्ञा उपलेंचवार, रश्मी चेपूरवार यांनी देखील आपआपल्या कविता सादर केल्या. संमेलनाचे संचालन दिप्ती पट्टलवार यांनी केले, Pandey Layout तर आभार प्रदर्शन लता कटारमल यांनी करून कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या उत्साहात साजरा केला.
सौजन्य: दीप्ती पट्टलवार, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0