प्राची फडके यांना पीएच.डी. प्रदान

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Prachi Phadke प्राची मुकुंद फडके यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, “ए स्टडी ऑन वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट बाय ग्रोसर्स विथ स्पेशल रेफरन्स टू नागपूर सिटी”. या प्रबंधासाठी त्यांना धनवटे नॅशनल कॉलेजचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राजकुमारगिरी एन. गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य व स्टाफ मेंबर्स तसेच सिटी प्रिमियर कॉलेज चे मॅनेजमेंट व प्राचार्य यांचे त्यांनी विशेष आभार मानले. प्राची फडके यांनी त्यांच्या यशाचे श्रेय मार्गदर्शक व कुटुंबातील सदस्यांना दिले.
 
 
Prachi Phadke
सौजन्य: गजानन रानडे, संपर्क मित्र