पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवक पदांसाठी चुरस

09 Mar 2026 12:55:51
पुणे :
Pune Municipal Corporation, पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी ११९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. या विजयानंतर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय वर्तुळात चुरस वाढली आहे. याआधी पाच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जात होती, पण राज्य सरकारने कायद्यात बदल करत ही संख्या दुप्पट करत १० केली आहे. त्यामुळे या पदांसाठी पक्षांतर्गत तसेच बाहेरून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
 

Pune Municipal Corporation 
निवडणुकीच्या निकालानुसार भाजपला ७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला २, आणि काँग्रेसला १ अशा एकूण दहा स्वीकृत नगरसेवक पदांची नियुक्ती होणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या सर्व पक्षांच्या गटनेत्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे शिफारस करण्यासंबंधी पत्र दिले आहे. या नावे ९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयुक्तांकडे सादर करावीत आणि त्यावर अंतिम निर्णय महापालिकेच्या मार्च महिन्यात होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत घेतला जाईल.महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळाल्याची भावना निर्माण झाली. काही कार्यकर्त्यांना एबी फॉर्म देऊनही शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेण्यात आली, तर काही ठिकाणी स्थानिक राजकीय समीकरणांमुळे उमेदवारी रद्द झाली. यामुळे नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षांनी स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे आश्वासन दिले होते. स्वीकृत नगरसेवक पद मिळाल्यास नगरसेवक म्हणून ओळख मिळते तसेच महापालिकेच्या अर्थसंकल्पातून काही निधी विकास कामांसाठी Pune Municipal Corporation,  मिळतो. यामुळे, अनेक इच्छुकांनी उच्च पातळीवर संपर्क साधून या पदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या मोठी असल्याची माहिती मिळाली आहे.
 
 
नियमांनुसार, स्वीकृत नगरसेवक पदे डॉक्टर, अभियंते, वकील, तज्ज्ञ किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना देण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात, बहुतेक वेळा राजकीय पक्षांशी संबंधित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना या पदांवर संधी मिळते. त्यामुळे या पदांसाठी पक्षांतर्गत समीकरणे आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
काँग्रेसमध्येही स्वीकृत Pune Municipal Corporation,  नगरसेवक पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसला एकाच जागेसाठी ६८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि अंतिम निर्णयासाठी अहवाल प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात येणार आहे. या एकाच जागेसाठी दावेदारांमध्ये माजी आमदार रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे, माजी नगरसेविका लता राजगुरू, काँग्रेसचे राज्य प्रवक्ते व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा नीता रजपूत, माजी अध्यक्ष वीरेंद्र किराड, माजी नगरसेवक अजित दरेकर, सुनील मलके आणि कैलास गायकवाड यांचा समावेश आहे.महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्त्या आगामी राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकतात. या पदांसाठी पक्षांतर्गत व पक्षबाह्य इच्छुकांची कसरत अधिक वाढण्याची शक्यता आहे. ९ मार्च रोजी नावे आयुक्तांकडे सादर केल्यानंतर, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येईल.
.
Powered By Sangraha 9.0