कॉलेजच्या HOD ची गळफास घेऊन आत्महत्या

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
पुणे,
Raju Patil Death Case पुणे शहरातील शैक्षणिक क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सिंहगड डेंटल कॉलेज मधील विभागप्रमुख (HOD) राजू पाटील यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे महाविद्यालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे.
 

Raju Patil Death Case PUNE 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्या वेळी पाटील यांच्या पत्नी घरी परतल्या असता त्यांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांसह सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.प्राथमिक तपासात घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण हेच आहे की इतर काही कारणे आहेत, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.दरम्यान, काही दिवसांपूर्वी MUHS यांनी सिंहगड डेंटल कॉलेजवर शैक्षणिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली होती.
शिक्षकांचे थकीत वेतन,Raju Patil Death Case  तसेच शैक्षणिक कामकाजातील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत विद्यापीठाने महाविद्यालयाची संलग्नता रद्द केली होती. तसेच दंतविद्याशाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही असंलग्नित करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणाचा उल्लेख आढळल्यामुळे विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून तपासानंतरच आत्महत्येमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.