कचरा डेपोला भीषण आग... धुराने वाहतूक विस्कळीत

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
सातारा
garbage depot fire सातारा शहराजवळील सोनगाव येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या आगीतून उसळणाऱ्या प्रचंड ज्वाळा आणि दाट धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरील वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला.
 

Satara garbage depot fire, Songav garbage dump fire Satara, 
मिळालेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील कचरा डेपोला अचानक आग लागली. कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्यामुळे आगीने काही वेळातच भीषण स्वरूप धारण केले. आगीच्या ज्वाळा जमिनीपासून तब्बल ५० फूट उंच उसळताना दिसत होत्या. त्याचबरोबर दाट धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरल्यामुळे काही काळ संपूर्ण परिसर धुराने झाकोळला गेला.धुरामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही काळ तर रस्त्यावर समोरचेही स्पष्ट दिसेनाशी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून त्यातून आगीची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे.
 
 
घटनेची माहिती garbage depot fire मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून पाण्याचे फवारे मारण्यात येत असून पाण्याचे टँकरही घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.दरम्यान, कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्यामुळे ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागू शकतात, अशी माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. नागरिकांनी या परिसरात सतर्कता बाळगावी आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.