लग्न, धर्मांतरण आणि घरवापसी; 'या' मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला मूळ धर्म!

09 Mar 2026 17:16:49
पुणे,
sayali-surve-conversion-case : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे पुन्हा चर्चेत आली आहे. २०१९ मध्ये तिने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मराठी व्यापारी आतिफ तासेशी प्रेमविवाह केला. लग्नानंतर तिला धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला आणि तिने मानसिक व शारीरिक त्रास सहन केला असल्याचे तिने सांगितले.
 
 
 
SAYALI SURVE
 
 
चार मुलांच्या भविष्यासाठी तिने हा त्रास काही काळ सहन केला, पण परिस्थिती गंभीर होत गेल्याने तिने उघडपणे या सर्वाबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला. हिंदू संघटनांच्या मदतीने सायलीने वैदिक पद्धतीने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. लग्नानंतर तिचे नाव ‘अतेजा तासे’ ठेवले गेले होते, परंतु आता तिने पुन्हा आपले मूळ नाव आद्या सुर्वे ठेवले आहे.
 
सायलीने सांगितले की, आतिफशी केलेले लग्न तिच्या आयुष्यातील चुकीचा निर्णय होता, आणि पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतल्याने तिला मानसिक समाधान मिळाले आहे.
Powered By Sangraha 9.0