-एसबीएल कंपनी स्फोट : २३ वर पोहोचली मृतांची संख्या
नागपूर,
SBL company explosion काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल कंपनी लिमिटेडमध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उपचाराखाली असलेल्या एका जखमी कामगार महिलेचा मृत्यू झाला. आता या स्फोटातील संख्या आता २३ वर पोहोचली आहे. सीमा विजय धुर्वे (२७) असे मृतक कामगार महिलेचे नाव असून त्यांचा ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान सोमवार, ९ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्या ७० टक्के जळाल्या होत्या.
SBL company explosion दरम्यान, स्फोटात सर्वाधिक कामगार महिला होत्या, ज्यांच्यावर उपचारादरम्यान मृत्यू ओढवला. या स्फोटात जखमी आम्रपाली कालसर्पे यांचे शनिवारी रात्री ११ वाजता तर रोशनी उमाठे या महिला कामगाराचे सोमवारी दुपारी निधन झाले. या घटनेने नागपूर जिल्ह्यातील विविध स्फोटक निर्मिती कंपनीच्या सेफ्टी ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधिमंडळात देखील याविषयी लक्षवेधी चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी या स्फोटके तयार करणार्या कंपनीत १६ दिवसापूर्वी ही भीषण घटना घडली.