इंटरनेटवर स्वतः निदान धोकादायक: डॉ. पुसदकर

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Dr. Pusadkar आजच्या इंटरनेटच्या युगात अनेक रुग्ण आजाराचे निदान स्वतःच गुगलवर शोधून काढतात आणि त्यानुसार उपचार मागतात. मात्र, आयुर्वेद उपचार हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृती, दोष आणि आजाराच्या मूळ कारणांवर आधारित असतात. त्यामुळे स्वतःच निदान करून उपचार ठरवणे धोकादायक ठरू शकते, असे मत विश्वकुंभ आयुर्वेदिय चिकित्सालयाचे वैद्य डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर यांनी व्यक्त केले.
 
Dr. Pusadkar
 
डॉ. पुसदकर म्हणाले, “सध्या अनेक रुग्ण दवाखान्यात येताच थेट सांगतात – ‘माझ्यासाठी पंचकर्म करायचे आहे’, ‘माझ्यासाठी दोन तास मसाज करा’, किंवा ‘वमन करून उलट्या काढायच्या आहेत’. Dr. Pusadkar  परंतु आयुर्वेद शास्त्रानुसार कोणताही उपचार सुरू करण्याआधी रुग्णाची प्रकृती (वात-पित्त-कफ), नाडी परीक्षा, आहार-विहार, जीवनशैली आणि रोगाची अवस्था यांचा सखोल अभ्यास केला जातो. त्यानंतरच योग्य उपचार निश्चित केले जातात.”
 
ते पुढे म्हणाले, “पंचकर्म हे आयुर्वेदाचे ICU आहे. जसे आधुनिक वैद्यकशास्त्रात गंभीर रुग्णासाठी ICU आवश्यक असतो, तसेच आयुर्वेदात शरीरातील दोष शुद्ध करून गंभीर आजारांवर सखोल उपचार करण्यासाठी पंचकर्म अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे पंचकर्म हा केवळ फॅशन किंवा ट्रेंड नाही, तर तज्ञ आयुर्वेद वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करणे आवश्यक आहे. Dr. Pusadkar  ” डॉ. पुसदकर यांनी रुग्णांना सांगितले की, इंटरनेटवरील अपूर्ण माहितीवर अवलंबून न राहता तज्ञ वैद्यांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वतःच रोगाचे निदान करून उपचार ठरवणे ही आजच्या काळातील धोकादायक प्रवृत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सौजन्य : निकिता लुटे, संपर्क मित्र