लखनौ,
statements against Yogi's mother मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या मौलानाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या आईबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या मौलाना सलीमविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. बलरामपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बलरामपूरसह उत्तर प्रदेशातील ८३ पोलिस ठाण्यांमध्ये मौलानाविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. हिंदू संघटना, सामाजिक कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी मौलानाविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. जर मौलाना यांना लवकरच अटक केली नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.