जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
यवतमाळ,
Tejaswini Service Committee सुयोग्य व्यक्तीस पुरस्कार दिल्याने त्या पुरस्काराचे महत्व वाढते आणि पुरस्कार मिळणाèया व्यक्तीसही समाधान मिळते, ही बाब लक्षात घेऊन प्र. मा. रुईकर ट्रस्टने तेजस्विनी सेवा समितीच्या अध्यक्ष सुलभाताई गौड यांना ‘रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार’ देऊन त्यांनी केलेल्या समाजकार्याचा यथोचित गौरव केला आहे, असे उद्गार देवनाथ पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी काढले. जिनातील श्री गणपती मंदिर परिसरात शुक्रवार, 6 मार्च रोजी आयोजित ‘रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी या नात्याने आशीर्वाचन देताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्र. मा. रुईकर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उदय नावलेकर होते. प्र. मा. रुईकर ट्रस्टतर्फे प्रदान करण्यात आलेला हा द्वितीय पुरस्कार असून शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 51,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सत्काराला उत्तर देताना सन्मानमूर्ती सुलभा गौड अतिशय भावनाप्रधान होऊन म्हणाल्या की, असा हा मोलाचा पुरस्कार गुरुजींच्या हस्ते मला मिळतो आहे, ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. मी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.
Tejaswini Service Committee संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रमोद देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून पुरस्कार वितरणामागील संस्थेची भूमिका विशद केली. पुरस्कारासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीत दंत चिकित्सक डॉ. सुरेंद्र पदमावार, अनंत कौलगीकर, विवेक कवठेकर, तोष्णा मोकडे आणि पूजा देशपांडे यांचा समावेश होता. समितीतर्फे विवेक कवठेकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मागील वर्षी पुरस्कार मिळालेले संदीप शिंदे यांचा आणि सर्वाधिक रक्तदान शिबिरे आयोजित केल्याबद्दल राजेश व ऋचा गढीकर यांचा जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सुंदर सोहळ्याचे सूत्रसंचालन विश्वमांगल्य सभेच्या अध्यक्ष प्रज्ञा चिंचोळकर यांनी केले. पुरस्कारप्रात संस्थेची माहिती मनीषा पांडे यांनी दिली. आभारप्रदर्शन डॉ. ललिता घोडे यांनी केले. या कार्यक्रमाला यवतमाळ शहरातील अनेक मान्यवर तसेच रसिक श्रोते उपस्थित होते.