कन्नमवारच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे चौथ्यादा निविदा प्रेम

09 Mar 2026 13:56:49
वर्धा,
kannamvar health center building जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या कन्नमवार ग्राम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. याकरिता येथे नव्याने अडीच कोटीची इमारत मंजूर झाली असून त्या इमारतीच्या निविदा प्रक्रियेत घोळ होत असल्याने कंत्राटदारंच्या भुवया उंचावल्या आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. जवळपास या बांधकामला अडीच कोटीची मंजूर देण्यात आली असून त्याची निविदा काढण्यात आली आहे. जिल्हा परिषद बांधकाम कडून एकाच इमारतीचे निविदा एक दोन वेळा नव्हे तर चौथ्यादा निविदा काढल्याने कमालच केली आहे. या इमारतीचे बांधकाम जवळच्या हित संबंधतील लोकांना मिळवण्यासाठी RMC प्लॅन्ट अट टाकण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेत आर्वी येथील कंत्राटदार निविदा भरून सुद्धा त्यांना वगळन्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.तिसऱ्या निविदे मध्ये एक टेंडर जरी असले तरी ते टेंडर ओपन करावा लागतो.

kannamvar health center building 
 
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर होऊन जवळील हितसंबंध असलेल्या व्यक्तींना बांधकाम मिळण्यासाठी हेतूपरस्पर निविदा घोळ करत असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागातून दिसून येत आहे. त्यामुळे या इमारतीचे निविदा चौथादा काढल्याने बांधकाम विभागणे एक नवीनच विक्रम केला आहे.
चौथ्या निविदा कॉल ची आज शेवटची तारीख
9 मार्च ला सायंकाळी पाच वाजेपर्यंत या इमारतीचे निविदा भरण्यासाठी महा टेंडर वर टाकले आहे. आता या चौथ्या निविदा मध्ये एक टेंडर आणून त्याला ही काम देण्यात येणार असल्याची चर्चा आहे . त्यामुळे कोटीच्या काम मॅनेज करून आपल्याला काम मिळण्यासाठी हा प्रकार केला गेला असल्याने अनेक ठिकाणी कोटी च्या कामात पाटणर राहून आपली पोळी भाजत आहे. आरोग्य केंद्राची इमारत स्वतःला मिळण्यासाठी हा उठाठेव केल्याचं प्रकार आहे.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आपल्या मनमानी करत पदाचा गैरवापर केलाजात असल्याचा दबक्या आवाजात बांधकाम व्यावसायिक मध्ये चर्चा आहे.kannamvar health center building या संदर्भात जिल्हा परिषदेत के बांधकाम अभियंता गुंडतवार याच्यासोबत संपर्क संपर्क केला असता ते म्हणाले की या टेंडर करता कुठलेही प्रकारचे रिस्पॉन्स आले नाही आवश्यक ती कागदपत्र त्यांच्याकडे नसल्यामुळे तीनही टेंडर मध्ये त्यांनी एकाच व्यक्तीला नाकारण्यात आलेले आहे त्यामुळे चौथ्यांदा टेंडर काढण्यात आले आहे आरोळी येथून एक टेंडर आले होते मात्र ते अटी व शर्ती मध्ये बसत नसल्याचेही त्यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले.
Powered By Sangraha 9.0