विद्युत तारेच्या स्पर्शाने ट्रकला लागली आग

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
कळमेश्वर,
विद्युत तारेला स्पर्श झाल्याने Truck on fire ट्रकला आग लागली. ही घटना कोहळी मोहळी शिवारात रविवार, ८ मार्चला रात्री १० वाजता दरम्यान घडली. या आगीत ट्रकसह विद्युत कंपनीचे नुकसान झाले.
 
 
aas
 
Truck on fire  प्राप्त माहितीनुसार, नागपूर काटोल रोडवरील कोहळी मोहळी शिवारात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाण पुलाचे कामावरील मुरूम व मातीचे वाहतूक करणारा ट्रकच्या (क्र. एम एच ४०, बीजी ९९९३) मागील भागाचा स्पर्श विद्युत तारेला झाला व ट्रकला आग लागली. या आगीची माहिती कळमेश्वर पोलीस स्टेशन. व कळमेश्वर नगरपरिषद अग्निशमन दलाला देण्यात आली. कळमेश्वर अग्निशमन दलाचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. या आगीमध्ये ट्रकचे व विद्युत वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे.