ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; पत्नीची आत्महत्या!

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
ठाणे,
sweeper-murdered-wife-commits-suicide : उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप याची भरदिवसा ऑन ड्युटी हत्येची धक्कादायक घटना घडली. महादू जगताप कोणार्क कंपनीकडे काम करत होते. सकाळी उल्हासनगर कॅम्प 3 मधील सेक्शन 20 परिसरात आनंद आईस्क्रीमजवळ सफाई करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला आणि ते जागीच ठार झाले. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला.
 
 

MUDER 
 
 
हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिस त्या आधारावर आरोपीच्या शोधात आहेत. या घटनेनंतर महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे.
 
या दुर्दैवी घटनेनंतर महादू जगताप यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या दुहेरी घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 
याच दरम्यान जळगावमध्येही धक्कादायक घटना घडली. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत निलेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्येचे जीवन संपवल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांवर तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरली आहे.