‘भाभीजी घर पर हैं' बंद होणार का?

01 Apr 2026 12:26:52
मुंबई,
Bhabiji Ghar Par Hain छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका भाभीजी घर पर हैं 2.0 संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू झालेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, शिल्पा शिंदे यांचा कमबॅकनंतर अवघ्या दोन महिन्यांतच मालिकेवर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

Bhabiji Ghar Par Hain 2.0 show ending 
या निर्णयामागे अँड टीव्ही वाहिनीतील मोठे धोरणात्मक बदल कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. नव्या व्यवस्थापनाने पदभार स्वीकारल्यानंतर Bhabiji Ghar Par Hain वाहिनीच्या कंटेंट स्ट्रॅटेजीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, नवीन कार्यक्रमांची निर्मिती थांबवून जुन्या कार्यक्रमांचे पुनःप्रसारण करण्यावर भर देण्याची योजना आखली जात आहे.या बदलाचा थेट परिणाम ‘भाभीजी घर पर हैं 2.0’सह इतर सुरू असलेल्या मालिकांवर होणार आहे.मालिकेतील कलाकारांना ५ एप्रिल रोजी शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, मालिकेचा अंतिम भाग १६ एप्रिल २०२६ रोजी प्रसारित होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0